Wednesday, September 17, 2008
नाट्यरसिकांची पंढरी
नाट्यरसिकांची पंढरी - गणेश आचवल
नाटक क्षेत्रात महत्त्वाची समजण्यात येणारी ही आयएनटी स्पर्धा १९७२ मध्ये सुरू झाली. यंदाचं हे एकांकिकाचं ३७ वं वर्ष. गेली अनेक वर्षं ही स्पर्धा चनीर्रोडच्या मुंबई मराठी साहित्य संघात होत होती. साहित्य संघ म्हणजे नाट्यरसिकांचं आवडतं ठिकाण. तिथला माहौलच काही वेगळा असतो. साहित्य संघ आणि आयएनटी असं समीकरण होऊन गेलं होतं. गेली पाच वर्षं मात्र आयएनटी मराठी एकांकिका स्पर्धांचं आयोजन सचिवालायजवळील यशवंतराव चव्हाण सेण्टरमध्ये केलं जातंय. गेली काही वर्षं या स्पधेर्चं स्वरूप थोडंसं बदललंय. तीन टप्प्यांमध्ये पूर्व प्राथमिक फेरीचं आयोजन होतं. ही फेरी तालीम स्वरूपात घेतली जाते. त्यातून प्राथमिक फेरीसाठी वीस एकांकिकांची निवड केली जाते. त्यातून मग, पाच एकांकिका अंतिम फेरीसाठी निवडल्या जातात.
या स्पधेर्त नवीन संहितांचंच सादरीकरण व्हावं, हा नियम आहे. त्यामुळे सध्या जगात काय चाललं आहे, याचं प्रतिबिंब सादर होणाऱ्या नाटकांमधून दिसतं. अनेक लेखक, दिग्दर्शक, कलाकार यांच्या जीवनाला आयएनटीनेच दिशा दिली आहे. दिग्दर्शक म्हणून यशस्वी झालेला अद्वैत दादरकर याबद्दल म्हणतो, 'आयएनटी या नावालाच एक ग्लॅमर आहे, मोठी परंपरा आहे. आम्ही रूपारेलचे असल्यामुळे रूपारेलचा आयएनटीतील परफॉर्मन्स चांगलाच व्हायला हवा, असं एक सकारात्मक दडपण असायचं. मुख्य म्हणजे दिग्दर्शक या नात्याने वेगळे विषय मला आयएनटीच्या माध्यमातून हाताळायला मिळाले. यात यशस्वी होण्यासाठी कोणताही ठराविक फॉर्म्युला नाही, हे स्पधेर्चं आणखी एक वैशिष्ट्य. नवीन संहितेची अट असल्याने आजच्या काळातला कण्टेण्ट पाहायला मिळतो.' अद्वैतने दिग्दशिर्त केलेली 'तीच ती दिवाळी' ही एकांकिका प्रथम पारितोषिकाची, तर 'मृगाचा पाऊस' ही एकांकिका तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली होती. 'वदनी कवळ घेता' ही एकांकिका फायनलला आली होती.
अनिकेत विश्वासरावच्या आयुष्याचा टनिर्ंग पॉइण्ट ठरलेली हीच आयएनटी स्पर्धा. तो म्हणतो, 'मी डहाणूकर कॉलेजतफेर् सातत्याने या स्पधेर्त सहभागी व्हायचो. 'कठीण कठीण कठीण किती' या एकांकिकेतील माझ्या लहानशा भूमिकेसाठी मला सवोर्त्कृष्ट विनोदी अभिनेत्याचं पारितोषिक मिळालं होतं. ही एकांकिका पाहायला दिग्दर्शक ऋषी देशपांडे आले होते. माझं काम पाहून त्यांनी 'नायक' या झी मराठीवरील मालिकेत मला महत्त्वाची भूमिका दिली. आयएनटीमुळेच मला हा प्लॅटफॉर्म मिळाला.'
आयएनटीमध्ये गाजलेल्या काही एकांकिका पुढे व्यावसायिक रंगभूमीवर नाटक म्हणूनही यशस्वी झाल्या. त्यामध्ये ऑल द बेस्ट, यदाकदाचित, जाणूनबुजून आणि ग म भ न यांचा उल्लेख करावा लागेल. सिद्धार्थ जाधवचं रूपेरी पडद्याशी नातं जुळलं, ते याच आयएनटीमुळे! तो म्हणतो, 'माझा पहिला इण्टरकॉलेजिएट परफॉर्मन्स आयएनटीमध्येच मी दिला. 'लक्ष्मीनारायणाचा जोडा' या रूपारेल न्यू लॉ कॉलेजतफेर् सादर केलेल्या एकांकिकेसाठी मला सवोर्त्कृष्ट अभिनेत्याचं अॅवॉर्ड मिळालं. मॉबमध्ये जरी एखाद्याने काम केलं, तरी त्याला आयएनटीमध्ये काम करायचं जे समाधान मिळतं, ते महत्त्वाचं असतं. बक्षीस स्वीकारताना आम्ही ढोलताशे वाजवत घातलेला धिंगाणा मी विसरूच शकत नाही.'
यंदा आयएनटीच्या मराठी एकांकिका स्पधेर्त एकूण ४८ कॉलेजेस सहभागी झाली आहेत. रुईया, रूपारेल या कॉलेजांबरोबरच गेल्या काही वर्षांत टी.के. टोपे नाइट कॉलेज, विकास कॉलेज, एसएनडीटी अशी फारशी न नावजलेली कॉलेजेसही अंतिम फेरीत दाखल होऊन यश मिळवताना दिसतात. म्हणजे दादा लोकांच्या रांगेत आता
नवनवीन कॉलेजेसही येत आहेत, हे विशेष!
सवोर्त्कृष्ट लेखकाचा पुरस्कारही आयएनटीतफेर् दिला जातो. सध्या 'असंभव' मालिकेचं लेखन करणारा अंबर हडप म्हणतो, 'मी शैलेंद कॉलेजसाठी 'टाइम मॅनेजमेण्ट' ही एकांकिका लिहिली होती. यासाठी मला सवोर्त्कृष्ट लेखनाचा पुरस्कार मिळाला. तसंच 'लव्ह अॅण्ड दी ब्लाइण्ड' या मी लिहिलेल्या एकांकिकेतून मला लोकप्रियता मिळाली. गेल्या वषीर् रुईया कॉलेजसाठी लिहिलेल्या 'मुक्तिधाम' एकांकिकेला अनेक पुरस्कार लाभले. याचं श्रेय आयएनटीलाच!
मराठीप्रमाणेच गेली काही वर्षं हिंदी एकांकिकाही आयोजित केल्या जात आहेत. यंदाच्या वषीर् 'अस्तित्व', 'आयएनटी' आणि मिठीबाई कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी एकांकिका स्पर्धा सादर झाली. याची अंतिम फेरी २० सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून भाईदास हॉल इथे होईल.
आयएनटीने जे कलावंत मराठी रंगभूमीला दिले, त्यात विनय आपटे, स्वाती चिटणीस, सतीश पुळेकर, अंकुश चौधरी, भरत जाधव, अतुल परचुरे, राजश्री ठाकूर, श्रेयस तळपदे, नीलम शिकेर्, अदिती सारंगधर, संतोष पवार, निशिकांत कामत अशा अनेकांचा उल्लेख करावा लागेल. ही यादी न संपणारी अशी आहे. फायनलची तिकिटं मिळवण्यासाठी रांगा लावणं, तीन तीन महिने आधीपासून तालमी करणं असं उत्साही वातावरण आयएनटीच्या निमित्ताने दरवषीर् अनुभवायला मिळतं. कलाक्षेत्रातील मान्यवर ही स्पर्धा बघायला येत असल्याने त्यातील एखादा कलाकार, दिग्दर्शक एखाद्या गुणवंताला अचूकपणे हेरतो आणि त्या कलावंताच्या करिअरची दिशा तिथेच निश्चित होते.