Tuesday, September 16, 2008

"आयएनटी"चा आजचा पहिला दिवस.

आय.एन.टी चा आजचा पहिला दिवस ( 15/09/08).

कर्मवीर भाऊ राव पाटिल महाविद्यालयाने यंदाच्या स्पर्धेचा श्रीगणेशा केला.
पहिल्याच एकंकिकेत वीस विद्यार्थ्यानी स्पर्धेचा माहोल अचूक पकडला अणि स्पर्धेला दमदार सुरवात झाली .

यंदाच्या स्पर्धेच्या पूर्व प्राथमिक फेरी चे परीक्षक म्हणुन लेखक राजीव जोशी अणि दिग्दर्शक भालचंद्र झा काम पाहता आहेत.
राजीव जोशी सर या पूर्वी २००१ साली या स्पर्धेचे परीक्षक होते.आज सात वर्षानंतर परीक्षक म्हणुन काम करताना त्यांच्या जुन्या स्मृति पुन्हा जाग्या झाल्या.
त्या वेळेस ६४ एकांकिका स्पर्धेत होत्या आणि पूर्व प्राथमिक हा प्रकार नव्हता
एकांकिका थेट रंगमंचावर सादर होत. त्या परिस्थितीत जे जे होइल ते ते पाहावे अशी अवस्था होती.
आता किमान पूर्व प्राथमिकच्या चाळणी मुळे रंगमचावर काही दर्जेदार पाहायला मिळेल असे वाटते.
यंदाच्या स्पर्धेकडून आपल्याला खुप अपेक्षा असल्याचे राजीव जोशी म्हणाले आता अवेरनेस वाढला आहे ते पाहता दूरचित्रवाणी,वृत्तपत्र,वृत्तवाहिन्या माध्यमांच्या माध्यमातून माहितीच्या स्फोटामुळे आजच समकालीन वास्तव समोर येईल अशी आशा आहे.

भालचंद्र झा यांनी यापूर्वी १९९८ साली या स्पर्धेचे परीक्षक म्हणुन काम पाहिले आहे. आज नऊ वर्षानी परिक्षण करताना ते स्पर्धेचा विचार न करता स्पर्धकांच्या मानसिकतेचा जास्त विचार करतात. नऊ वर्षांपूर्वी भक्ति बर्वे , नीना कुलकर्णी यांना स्पर्धेत काही exciting वाटल नव्‍हते. पण माझे मत असे आहे की त्या त्या वेळेची स्‍वतःची अशी प्रत्येकाची एक संकल्पना असते.
त्या immature वाटत असल्या तरी स्‍वतःची भाषा विकसित करत असतील तर त्याला प्रोत्साहन द्यायला हवे.
प्रत्येक स्पर्धेकडून आपल्याला अपेक्षा असतात मात्र सध्याची तात्कालिक परिस्थिति विचारात घ्यायला हवी. सध्याची मूल intelligent आहेत मात्र त्यांच्याकड़े patience नाही.
मेहनत किती करावी याला मर्यादा आहेत. जरा नाव झाले की सीरियल लिहायच्या आहेत,कुठे Assit करायच आहे. त्यामुळे कामाच cactus वाढत जाते, मात्र focus point हलला आहे.
काही कल्पना जबरदस्त असतात मात्र त्या तिथेच संपतात, तेव्हा परीक्षक म्हणुन मानसिक तयारी आहे आता किमान काही वेगळे पाहायला मिळावे अशी अपेक्षा आहे.
आज नऊ पैकी सात एकांकिका सादर झाल्या.वि.वा महाविद्यालय आणि वसंतदादा पाटिल अभियांत्रिकी महाविद्यालयानी पूर्वकल्पना देवून स्पर्धेतून माघार घेतली.